कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ… पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?

कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ… पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?

| Updated on: Jun 11, 2026 | 5:43 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वादाची चर्चा रंगताना दिसत आहे. खासकरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुनील तटकरेंचं एक विधानत चर्चेत आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वादाची चर्चा रंगताना दिसत आहे. खासकरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच “मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही,” असे विधानही त्यांनी केले होते.

यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच छगन भुजबळ यांच्या विधानावर टोला लगावला आहे. सुनील तटकरे म्हणाले की, “छगन भुजबळ हे कबड्डीचे खेळाडू आहेत आणि ते सिने कलाकार व निर्माते आहेत. त्यांनी कबड्डीमध्ये एक-एक खेळाडू बाद केले आहेत आणि एका वेळेस सर्व खेळाडूंना बाद केले आहे. शिवसेनेत असताना त्यांनी दोन वेळा महापौर पद मिळवलं, मग तेव्हा त्यांनी कोणाला चेकमेट केलं?”

तसेच “आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू अजित दादांनी तयार केले आहेत,” असेही तटकरे यांनी म्हटले.

Published on: Jun 11, 2026 5:09 PM
Follow Us