राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीवर राजकारणातील घडामोडीसह पहा सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Oct 22, 2022 | 4:11 PM

दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यावरून राजकीय चर्चांना उत आला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न केला असता, त्यांनी यात गैर काय असा सवाल केला आहे. तर दिवाळीत सगळ्यांनाच एकत्र यायला हवं. एकमेकांना शुभेच्छा द्यायाला हव्यात असेही पवार म्हणाले.

Follow us on

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडत शिंदे यांनी त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्ष काढला. त्यांनी स्वत: ची राजकीय ताकद वाढवत मुख्यमंत्री पदही आपल्याकडे घेतले आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहेत कुठे असा सवाल अनेक विरोधक करताना दिसले. आताही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डीवचले आहे. त्यांनी ठाकरे यांची शिवसेना उरलेच किती असे म्हणत हा गट राहील्याचं म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटातील उरललेले आमदारही आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचेही राणे यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी काल दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यावरून राजकीय चर्चांना उत आला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न केला असता, त्यांनी यात गैर काय असा सवाल केला आहे. तर दिवाळीत सगळ्यांनाच एकत्र यायला हवं. एकमेकांना शुभेच्छा द्यायाला हव्यात असेही पवार म्हणाले. तर राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येण्यावरून मंत्री गिरीष माहाजन यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे. एकिकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या एकत्र येण्यात अयोग्य काय असे म्हटलं असतानाच दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते सुरज चव्हाण यांनी खोचक टीका केली आहे. चव्हाण यांनी मनसे आणि भाजपचं नातं हे लिव्हईन रिलेशनशिपसारखी असल्याचं म्हटलं आहे.