SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 August 2021

| Updated on: Aug 02, 2021 | 8:38 AM

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

Follow us on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं. कोयना धरणातून विसर्ग करण्यात येत असल्यानं सांगलीत अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.