अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता…

| Updated on: Jun 06, 2026 | 1:37 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. रोहित पवारांच्या अन्न त्यागाच्या निर्णयाबाबतही त्यांनी मत मांडले.

राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. रोहित पवारांच्या अन्न त्यागाच्या निर्णयाबाबतही त्यांनी मत मांडले.

अलीकडेच राज ठाकरेंच्या मागणीनंतर बॅलेट पेपरची पुन्हा चर्चा सुरू झाली. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला इव्हीएमचा काही त्रास नाही, मात्र भाजपला जर इतका आत्मविश्वास आहे, तर त्यांनी एखादी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी.” पुढे त्या म्हणाल्या, “एकूण निवडणुका कोणत्याही असो, घोडेबाजारी ही झालीच आहे. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. महत्त्वाची बाब म्हणजे मी या घोडेबाजारीबाबत एक प्रस्ताव करणार आहे.” त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिउत्तरसुद्धा दिले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांच्या गटासाठी उमेदवारा मागे घेतला का असा प्रश्न विचारताच त्यांनी तेट उत्तर दिलं. त्या पुण्यातील उमेदवाराच्या माघारीबाबत म्हणाल्या, आम्ही महाविकास आघाडीत बैठक घेऊन चर्चा करून मघारीचं ठरवलं होतं, तो फक्त आमच्या पक्षाचा नाही सगळ्यांचा निर्णय होता.

रोहित पवारांच्या अन्न त्यागाबाबत सुप्रिया सुळेंनी महत्त्वाचे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “मी रोहितला विनंती करेन की त्याने इतके टोकाचे पाऊल उचलू नये. आधी पॉलिसी येऊ द्यावी. त्यात मागण्या पूर्ण होत आहेत की नाही हे पाहूया, त्यानंतर मोठा निर्णय घेऊ.”

Published on: Jun 06, 2026 1:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us