दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर…

| Updated on: Nov 12, 2026 | 7:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांना कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि अजित पवार गेल्यानंतर त्यांनी या विषयावर पडदा टाकल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी विलीनीकरणाचा विषय तेव्हाच संपला, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि अजित पवार गट यांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सुळे यांनी जोर देऊन सांगितले की, “माझा भाऊ (अजित पवार) गेल्यानंतर, मी स्वतः या सगळ्या विषयावर पडदा टाकलेला आहे.

त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यावर अजून काही वेगळं बोलण्याचं काही कारण आहे.” त्यांच्यासाठी हा विषय तेव्हाच संपला असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. शरद पवार यांना विविध पक्षांचे नेते आणि अजित पवार गटातील आमदार भेटत असतात. त्यात काही नवीन किंवा गैर नाही, असेही त्या म्हणाल्या. अजित पवार कोणाला भेटतात, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विलीनीकरणाच्या चर्चांवर त्यांनी आता पूर्णविराम दिला आहे.

Published on: Nov 12, 2026 7:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us