मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व खासदार सोमवारी सकाळी 11 वाजता संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणि केंद्र सरकारकडून आवश्यक मदतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळावी, तसेच राज्यातील प्रभावित भागांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी खासदारांकडून पंतप्रधानांसमोर विविध मागण्या मांडल्या जाण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या भेटीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा होते आणि केंद्राकडून काय आश्वासन मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.