सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा होता नाही, आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनचा इशारा दिला आहे. याचदरम्यान आमदार सुरेश धस यांनी आज ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा होता नाही, आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनचा इशारा दिला आहे. याचदरम्यान आमदार सुरेश धस यांनी आज ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धस यांनी रोखठोक भूमिका मांडली. संतोष देशमुखांची हत्या हा राज्याच्या मनाला लागलेला चटका आहे. ” या घटनेतीस आरोपी तारखेला आल्यावर मोठमोठाले बूट घातलेले, चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात. आरोपींचे मनोबल वाढवण्यासाठी ते येतात, असा आरोप त्यांनी केला. म्हणूनच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण आवश्यक आहे. कृष्णा आंधळे हा शातीर आहे, त्याला तात्काळ अटक करावी” अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोही धस यांनी केला.
मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या मागण्या काय ?
1) पीआय महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.
2) फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा.
3) वाशी पोलीस स्टेशनचे पीएसआय घुले, दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिकड यांचे सीडीआयर तपासा , सहआरोपी करा.
4) आरोपींना फरार करण्यात मदत करणारे संभाजी वायबसे, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळेला सहआरोपी करावं.
यासह अनेक मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
