Sushma Andhare | मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही, तर माझे यजमानच… रुपाली चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत सुषमा अंधारे बरसल्या

| Updated on: Mar 20, 2026 | 12:50 PM

कॅप्टन खरात, म्हणजे भोंदू बाबा यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री आणि बड्या राजकीय हस्तींची नावं व फोटो समोर येत आहेत. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आम्ही विरोधी बाजूवर असलो तरीही, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीली कारवाई कौतुकास पात्र आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.”

कॅप्टन खरात, म्हणजे भोंदू बाबा यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री आणि बड्या राजकीय हस्तींची नावं व फोटो समोर येत आहेत. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आम्ही विरोधी बाजूवर असलो तरीही, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीली कारवाई कौतुकास पात्र आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.” यांच्या म्हणण्यानुसार, गृहमंत्र्यांकडे काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या जातात. या अपेक्षांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा उल्लेख गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले की, “रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यानुसार त्यांचा व्यक्तीगत काही संबंध नाही, फक्त ट्रस्टपुरता संबंध होता. मात्र चाकणकर यांनी खरात यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले, “ज्योतिष सांगणं वेगळं आणि तंत्र मंत्र विद्या करणं वेगळी गोष्ट आहे. काळी जादू, अघोरी विद्या अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करतात.” सोशल मीडियावर त्यांनी स्पष्ट केले की, “मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही, तर माझे यजमानच माझी पूजा करतात. मी किती सुधारणावादी आहे याचे उदाहरण म्हणजे आयोगाच्या पदावर असूनही, काही लोक फक्त त्यांच्या पदाचा आधार घेऊन खरात यांच्या पायाशी लोळण घेत आहेत,” अशी टीका अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर केली.

Published on: Mar 20, 2026 12:50 PM
Follow Us