Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…

Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…

| Updated on: Apr 14, 2026 | 10:45 AM

नाशिकमधील TCS युनिटमध्ये लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरणाच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक एफआयआर दाखल झाले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनेकांचे फोन फॉरेन्सिक टीमकडे देण्यात आले असून या प्रकरणी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन याचं निवेदन समोर आलं आहे.

नाशिकमधील आयटी कंपनी युनिटमध्ये लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरणाच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक एफआयआर दाखल झाले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनेकांचे फोन फॉरेन्सिक टीमकडे देण्यात आले असून या प्रकरणी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन याचं निवेदन समोर आलं आहे.

नाशिकमधील आयटी कंपनी युनिटमध्ये लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरच्या प्रकरणासंदर्भात एन. चंद्रशेखरन म्हणाले, ‘प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलं जात आहे.’ हे प्रकरण अत्यंत चिंत्ताजनक असल्याचंही त्यांनी निवेदनात सांगितलं. याशिवाय कंपनी तपासाला पूर्णपणे सहकार्य करतेय असंदेखील स्पष्ट केलं. कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत आम्ही झिरो टॉलेरन्स पॉलिसी अवलंबत असल्याचंही त्यांनी या निवदेनात सांगितलं. प्रकरणासंबंधित पुढील तपास जगद गतीने सुरु आहे. संशयितांच्या फोनमधून बरिच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 13, 2026 8:48 PM
Follow Us