Vidhan Parishad Members Oath | मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की… 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, बच्चू कडू, दानवे, गोऱ्हे बनले आमदार
महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या दहा नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ. निलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिन कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश होता. यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग पाचव्यांदा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेत विशेष लक्ष वेधून घेतले.
या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. शपथविधीनंतर सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.