ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 21, 2026 | 12:00 PM

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) यांच्या बंडखोर 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी दिल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून, कायदेशीर लढाई लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. कोणताही सदस्य स्वतःहून विलीनीकरण करू शकत नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

दानवे यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत लोकसभा अध्यक्षांना यापूर्वी पत्र देण्यात आले होते. मात्र, त्या पत्राला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे लोकशाही, नियम आणि कायद्याची योग्य अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

ठाकरे गट या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून, संबंधित खासदारांविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 21, 2026 12:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us