Nitesh Rane : डुक्कराला मंत्री नितेश राणेंचा चेहरा अन्… ठाकरे गटाच्या अनोख्या आंदोलनानं वाद पेटणार?
सोलापूरमध्ये वराहाच्या फोटोला नितेश राणे यांचा चेहरा लावत अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आलंय. मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांच्याकडून हे आंदोलन करण्यात आलंय.
सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, आज भाद्रपद शुद्ध द्वितीया 25 ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती वेगवेगळ्या ठिकाणी भाजपकडून साजरी करण्यात येत आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे 25 ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली होती.
“हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव (भगवान) तिसरा अवतार मानले जातात. सर्व प्रकारच्या दृष्टप्रवृत्तीचा नाश करणारा आहे. 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती येत आहे. या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतीक महत्त्व अपार आहे. वराह भगवानाच्या पूजनाने समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते” असं राणेंनी या पत्रात म्हटलं होतं. यावरून मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक होत वराहाला नितेश राणे यांचा चेहरा लावत अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येतंय.
