अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे, उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांची टीका, अनिल परब यांचा पलटवार काय?
उद्धव ठाकरे यांच्या अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे तुकडे झाले, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. दिवाळीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कुरघोड्या आणि टोमणे मारतायत असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.तर यावर अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | उद्धव ठाकरे यांच्या अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे तुकडे झाले, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. दिवाळीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कुरघोड्या आणि टोमणे मारतायत असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय. तर आज राजकीय कारीटं फोडणार नाही, अस ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं असून त्यांनी शेलारांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेवर ही प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब म्हणाले, ‘मी आज कोणतंही उत्तर देणार नाही. आज फक्त कारीट पायाखाली फोडतात. दुसरं काही फोडत नाही आणि राजकीय कारीट फोडण्यासाठी बराच वेळ आहे.’, तर जनतेला शिवसेनेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देतो. असेही त्यांनी म्हटले.
Published on: Nov 12, 2023 1:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
