बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
ठाकरे गटाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधारी पक्षातील मंत्र्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बैठकीदरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाचा उल्लेख केला. सभागृहातील त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. तर संजय राऊत यांनी बावनकुळे त्यांची संवादशैली चांगली असल्याचे नमूद केले. इतकेच नाही तर त्यांचं काम चांगलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या बैठकीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून झालेले हे कौतुक विशेष मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही नेत्यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.