Mumbai | ई-चलनाविरोधात आझाद मैदानात वाहतूकदारांचे आंदोलन; सरकारला तातडीने निर्णय घेण्याचा इशारा
मुंबईत ई-चलन प्रणालीविरोधात आजपासून वाहतूकदार संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ई-चलनाच्या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा न निघाल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात वाहतूकदार एकत्र येणार आहेत. या आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
मुंबईत ई-चलन प्रणालीविरोधात आजपासून वाहतूकदार संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ई-चलनाच्या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा न निघाल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात वाहतूकदार एकत्र येणार आहेत. या आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वाहतूकदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मुंबईतील कळंबोली येथेही वाहतूकदार संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील काही वाहनांना काही काळासाठी थांबवण्यात आले होते, त्यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. वाहतूकदार संघटनांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळाला आहे. सरकारने लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे.
