tv9 Marathi Special Report | भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय? कुणावर साधला निशाणा?

tv9 Marathi Special Report | भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय? कुणावर साधला निशाणा?

| Updated on: Mar 31, 2026 | 10:48 AM

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. खरात याला विधान परिषदेवर आमदार करण्यासाठी तसेच स्वतःला मंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भेट घेतली का?, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. खरात याला विधान परिषदेवर आमदार करण्यासाठी तसेच स्वतःला मंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भेट घेतली का?, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे. देसाई यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. मात्र, देसाई यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह नीलम गोऱ्हे यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गोऱ्हे यांनी दिलेल्या आव्हानानंतर तृप्ती देसाई यांनी साक्षीदार पोलिसांसमोर उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि मंत्र्यांचे फोटो भोंदू खरातसोबत समोर आले असल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. तृप्ती देसाई यांनी उपस्थित केलेल्या आरोपांमुळे खरात याला आमदार करण्याचा प्रयत्न होत होता का?, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 31, 2026 10:48 AM
Follow Us