Indian Army : सॅल्यूट… बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून ‘पॉवरफूल’ व्हिडीओ शेअर

Indian Army : सॅल्यूट… बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून ‘पॉवरफूल’ व्हिडीओ शेअर

| Updated on: Apr 28, 2025 | 6:13 PM

त्रिशक्ती कॉर्प्सकडून भारतीय सैन्याचा एक व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय सैन्याची ताकद दाखवण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या बैसरन व्हॅली येथे गेल्या मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात २७ ते २८ पर्यटकांचा जीव गेला. यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने कठोर पाऊलं उचलली आणि पाच मोठे निर्णय घेतले. या निर्णयानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट पाहायला मिळाला. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असताना भारतीय सैन्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशातच त्रिशक्ती कॉर्प्सकडून भारतीय सैन्याचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय सैन्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बघा व्हिडीओ…

त्रिशक्ती कॉर्प्स ही भारतीय लष्कराची एक महत्त्वाची तुकडी आहे, ज्याचे मुख्यालय उत्तर बंगालमधील सिलीगुडी येथे आहे. या कॉर्पची स्थापना शिलाँगमध्ये 1960 मध्ये करण्यात आली होती आणि त्याचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याने केले होते.

Published on: Apr 28, 2025 06:13 PM