Pahalgam Attack : भारतासोबत मोठा दगफटका…चीननंतर तुर्की धावलं पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते पुरवलं….

Pahalgam Attack : भारतासोबत मोठा दगफटका…चीननंतर तुर्की धावलं पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते पुरवलं….

Harshada Shinkar | Updated on: Apr 28, 2025 | 4:30 PM

भारताविरोधात तुर्कीकडून पाकिस्तानला मदत करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तुर्कीने पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी शस्त्र पाठवली आहेत. तुर्की लष्कराच्या एअर फोर्सचं विमान कराची विमानतळावर उतरलं असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील तुर्कीने भारताविरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. अशातच तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे. तुर्की आणि पाकिस्तानने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर धोरणात्मक भागीदारीत करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: तुर्कीने भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. तुर्कीने त्याची विमाने कराची आणि इस्लामाबादमध्ये उतरली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, यापूर्वी चीनने देखील भारताचा विश्वासघात करत PL-15 क्षेपणास्त्रे पाकिस्तानला पाठवली होती.  तुर्की येथून मालवाहू विमानांद्वारे शस्त्रे इस्लामाबादमध्ये पोहोचवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा तोच तुर्की देश आहे ज्याने नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर भारताकडे मदतीसाठी हात पसरले होते. मात्र आता तोच तुर्की पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत करत असल्याचे समोर आले आहे. तुर्की हवाई दलाचे सी-130 हरक्यूलिस लष्करी विमान रविवारी कराचीला पोहोचले असून त्यात शस्त्रे होती. सूत्रांच्या माहिती नुसार, साधारण सी-130 मालवाहू सहा विमाने पाकिस्तानात पोहोचली आहेत. या परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

Published on: Apr 28, 2025 4:24 PM
Follow Us