‘महाराष्ट्र केसरी’चा डाव संपला पण अजून दाव्यांची दंगल सुरू, थेट पंचालाच धमकी; बघा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की, स्पर्धेच्या अंतिम सामन्यांऐवजी उपांत्य सामन्याचा वाद चांगलाच रंगतोय, बघा कोणता आहे तो वाद ?
नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. या स्पर्धेतील कुस्तीचे सर्व डाव संपलेत तरी अद्याप दाव्यांची दंगल सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. कुस्तीचा पैलवान जसा डावावर प्रतिडाव टाकतो त्याचप्रमाणे महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख या स्पर्धकाचे समर्थक दाव्यांचे दावे प्रतिदावे सांगू लागले आहेत. या स्पर्धेत सिंकदरवर अन्याय झाला म्हणून एकाने थेट पंचानाच धमकी दिल्याचा फोन केला आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की, स्पर्धेच्या अंतिम सामन्यांऐवजी उपांत्य सामन्याचा वाद चांगलाच रंगतोय. खरा महाराष्ट्र केसरी सोलापूरचा सिकंदर शेख होता, मात्र पंचानी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप सध्या केला जात आहे. आरोपांच्या लढाईमध्ये सिकंदरला विजयी मानणारे थेट सामन्याच्या पंचाला थेट करून धमकावू लागले आहेत. बघा काय केला आरोप…
Published on: Jan 17, 2023 09:02 AM
