मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात मोठा निर्णय

मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात मोठा निर्णय

| Updated on: May 10, 2026 | 1:41 PM

ज सकाळी दहा वाजता सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास पाच दिवसांनंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पाच राज्याच्या निवडणूकांचे निकाल जाहिर झाले. यावेळी तामिळनाडूमधील अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने इतका मोठा विजय प्रथमच मिळवला. यानंतर आज सकाळी दहा वाजता सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास पाच दिवसांनंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री होताच तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Published on: May 10, 2026 01:41 PM
Follow Us