तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?

तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?

| Updated on: May 11, 2026 | 6:24 PM

काही दिवसांपूर्वीच पाच राज्याच्या निवडणूकांचे निकाल जाहिर झाले. यावेळी तामिळनाडूमधील अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने इतका मोठा विजय प्रथमच मिळवला

काही दिवसांपूर्वीच पाच राज्याच्या निवडणूकांचे निकाल जाहिर झाले. यावेळी तामिळनाडूमधील अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने इतका मोठा विजय प्रथमच मिळवला. यानंतर काल (१० मे २०२६) सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास पाच दिवसांनंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या चाहत्यांमध्ये भरभरुन उत्साह दिसून आला.

महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री झाल्यानंतर आज विजय यांनी प्रथमच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणामुळे घेतली गेली? यामागे काही हेतू आहे? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या भेटीनंतर तामिळनाडूच्या राजकारणात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

Published on: May 11, 2026 06:14 PM
Follow Us