इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के

| Updated on: Aug 15, 2026 | 7:47 PM

इंडोनेशियामध्ये एकाच दिवसात दोन मोठ्या भूकंपांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. 7.7 आणि 6.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या या भूकंपांमुळे 38 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व इंडोनेशियामध्ये 7.7 रिश्टर स्केलचा पहिला मोठा भूकंप झाला, त्यानंतर लगेचच उत्तर सुमात्रा प्रांतात 6.8 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची […]

इंडोनेशियामध्ये एकाच दिवसात दोन मोठ्या भूकंपांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. 7.7 आणि 6.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या या भूकंपांमुळे 38 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व इंडोनेशियामध्ये 7.7 रिश्टर स्केलचा पहिला मोठा भूकंप झाला, त्यानंतर लगेचच उत्तर सुमात्रा प्रांतात 6.8 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला.

या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आवश्यकता निर्माण झाली. एकूण 2000 हून अधिक नागरिकांना त्यांच्या घरांतून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक ठिकाणी इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे दृश्य अनेक भागांत दिसून आले आहे. नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असतानाचे हृदयद्रावक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून, नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.

 

Published on: Aug 15, 2026 7:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us