Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले….

Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले….

| Updated on: Jun 19, 2026 | 9:26 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.

मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अलीकडील घडामोडींवर भाष्य करत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील मतदारांची माफी मागत त्यांनी, जनतेने विश्वास ठेवून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी वेगळी भूमिका घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली.

यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबावर होत असलेल्या टीकेचाही उल्लेख केला. राजकीय संघर्षाच्या काळात स्वतःवर आणि कुटुंबीयांवर टीका होत असल्याचे सांगत, पक्षासाठी आणि राज्यासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून दिली.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पक्षफोडीचे राजकारण केल्याचा आरोप करत, सतत इतर पक्षांतील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या गटात सामील करण्याचे प्रयत्न का सुरू आहेत, असा सवाल उपस्थित केला. तसेच लोकशाहीतील जनादेश आणि मतदारांच्या विश्वासाचा आदर केला गेला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित केले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय फोडाफोडीवर भर दिला जात असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे राज्यातील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले असून, आगामी काळातील पक्षाची रणनीती आणि राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 19, 2026 9:25 PM
Follow Us