Uddhav Thackeray :  आपला गिचमिड देवेंद्र फडणवीस! ते पत्र वाचून दाखवताना ठाकरेंची फुल्ल टोलेबाजी; नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray : आपला गिचमिड देवेंद्र फडणवीस! ते पत्र वाचून दाखवताना ठाकरेंची फुल्ल टोलेबाजी; नेमकं काय म्हणाले?

Updated on: Oct 01, 2025 | 5:25 PM

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत भाष्य केले. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या. बघा नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रामध्ये सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पूरग्रस्त जनतेच्या मागण्या मांडताना म्हटले की, सरकारने तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी ५०,००० रुपये मदत द्यावी आणि त्यांच्यावरील सर्व कर्ज माफ करावे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत एका पत्राचा उल्लेख केला. ते पत्र वाचवून दाखवताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

२०२० साली देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. तेव्हा राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्याला मदत करणारा एक पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना दिलं होतं. त्यात विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दुख पाहून वेदना होत आहे, असं फडणवीस म्हणाले होते. विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का. मुख्यमंत्री असताना होत नाही का. मला वेदना झाल्या होत्या. त्यामुळे मी कर्ज माफी केली होती. फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. गिचमिड म्हणजे देवेंद्र फडणवीस. गिचमिड म्हणजे त्यांची सही. कळली नाही म्हणून

Published on: Oct 01, 2025 05:25 PM