ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह… राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चर्चा रंगली आहे. आधी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत.

विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीसाठी सचिन अहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गट अलर्ट मोडवर गेला आहे.
दरम्यान, आमदार सुनील शिंदे आणि काही नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही इतर आमदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
सततच्या राजकीय धक्क्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल होण्याच्या चर्चा आहेत.