लावा रे तो ऑडियो… पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट…

लावा रे तो ऑडियो… पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट…

| Updated on: Jun 27, 2026 | 12:27 PM

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी खासदारांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच इतर नेतेही उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांबाबत बोलताना सांगितले की, ‘माझ्या शब्दावर जनतेने काहीही विचार न करता या खासदारांना निवडून दिलं, आज त्यांनी लोकांचा विश्वासघात केला; त्याबद्दल मी जनतेची माफी मागणार आहे.’ पुढे ठाकरे म्हणाले, ‘मला खात्री आहे, जे फुटले ते खासदार आणि जे निष्ठावंत राहिले ते माझे कार्यकर्ते; त्यामुळे अशा गद्दारांचे जाणंच योग्य होते.’

पुढे एक ऑडिओ क्लिप लावून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदाराचा आवाज ऐकवला, ज्यामध्ये त्यांनी आईची शप्पत खाल्ल्याचे सांगितले जात आहे. ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर त्यांनी सांगितले की, हा केवळ आईचा नाही, तर समस्त हिंदू जनतेचा केलेला विश्वासघात आहे.

Published on: Jun 27, 2026 12:27 PM
Follow Us