Pune | पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यातील बाणेर परिसरात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दुपारपासून वातावरण ढगाळ झाले होते आणि त्यानंतर अचानक पावसाने हजेरी लावत काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला.
पुण्यातील बाणेर परिसरात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दुपारपासून वातावरण ढगाळ झाले होते आणि त्यानंतर अचानक पावसाने हजेरी लावत काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरात तापमानात वाढ झाली होती, त्यामुळे उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र या अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून वातावरणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून, शेतकरी आणि नागरिक दोघांनाही त्याचा परिणाम जाणवत आहे.
Published on: Mar 30, 2026 4:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
