Raigad Unseasonal Rain | महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान, नागरीकांना उकाड्यातून दिलासा

Raigad Unseasonal Rain | महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान, नागरीकांना उकाड्यातून दिलासा

| Updated on: Apr 24, 2026 | 1:13 PM

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत नागरिकांची धावपळ उडवली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारतींची पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या असून काही मालमत्तांचे नुकसान झाले आहे. विशेषतः जुन्या आणि कमकुवत बांधकामांना या वादळी वाऱ्याचा फटका बसल्याचे दिसून आले.

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत नागरिकांची धावपळ उडवली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारतींची पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या असून काही मालमत्तांचे नुकसान झाले आहे. विशेषतः जुन्या आणि कमकुवत बांधकामांना या वादळी वाऱ्याचा फटका बसल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत आणि रस्त्यांवर असलेल्या लोकांना आसरा शोधावा लागला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अशाच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

Published on: Apr 24, 2026 01:13 PM
Follow Us