उर्मिला मातोंडकरांकडून चिपळूणमधील पूरग्रस्तांची भेट, परिस्थिती पाहून अश्रू अनावर

| Updated on: Jul 28, 2021 | 5:59 PM

मला विश्वास आहे, परमेश्वराने त्यांना वाचवलंय, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिलंय, माझ्या परीने ते पूर्ण करेन, अजून काय करु, असं म्हणत उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडायला लागल्या.

Follow us on

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “सध्याची परिस्थिती पाहाता, कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. टीव्ही 9 मुळे आम्ही इथे पोहोचलो. मी प्रार्थना करते, टीव्ही 9 असो किंवा अन्य मीडियामुळे लोक इथे पोहोचतील. हे घर खरोखरच आतमध्ये आहे. कशी मदत पोहोचणार माहिती नाही. मला विश्वास आहे, परमेश्वराने त्यांना वाचवलंय, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिलंय, माझ्या परीने ते पूर्ण करेन, अजून काय करु, असं म्हणत उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडायला लागल्या.