व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
राज्य सरकारने व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. चित्रपट, संगीत आणि अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा यंदा या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (29 जुलै) बुधवारी याबाबत अधिकृत माहिती दिली.

यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसंगीतासह भक्तीगीत, भावगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांच्या रचनांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे.
अभिनेते प्रसाद ओक यांना चित्रपट क्षेत्रातील विशेष योगदानासाठी व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत हा सन्मान देण्यात येणार आहे. धर्मवीर आणि धर्मवीर 2 या चित्रपटांच्या दिग्दर्शनामुळे त्यांची विशेष चर्चा झाली होती.
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांत दीर्घकाळ मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्कारांद्वारे गौरव केला जातो.