Vaishnavi Hagawane Case : पुण्याच्या वैष्णवीची हत्या की हुंडाबळी? राजकीय नेत्याकडून सूनेचा बळी, बघा A to Z कहानी, नेमकं घडलं काय?

Vaishnavi Hagawane Case : पुण्याच्या वैष्णवीची हत्या की हुंडाबळी? राजकीय नेत्याकडून सूनेचा बळी, बघा A to Z कहानी, नेमकं घडलं काय?

| Updated on: May 24, 2025 | 11:32 AM

पुण्यातील वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हा प्रश्न तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून पुढे येतोय. कुटुंबियानी तर सासऱ्यांच्या मंडळींवरच हत्येचा आरोप केला आहे. आरोपी हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे अद्यापही फरार आरोपी सापडत नाहीत का असा प्रश्न पीडित पालकांनी केलेला आहे

पुण्यातले वैष्णवी आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं. संसार फुलायला सुरुवात झाली आणि काही दिवसांपूर्वी वैष्णवीच्या मृत्यून या साऱ्याचा शेवट झाला. तेवीस वर्षीय वैष्णवीने गळफास घेऊन स्वतःला संपवलं. पण ही आत्महत्या होती की हत्या याची उकल पोलिसांना करावी लागणार आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार वैष्णवीच्या सासऱ्यांकडून दोन कोटी रुपयांसाठी मागणी होत होती. जमीन खरेदीसाठी हगवणे कुटुंबीय वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडे तगादा लावत होते. वैष्णवीचा पती शशांक हगवणे राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याचे वडील राजेंद्र हगवणे अजितदादा गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावर जखमाही आढळल्यामुळे संशय वाढला आहे. एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी तीन जणांना कोठडी आणि दोन जण फरार झाले. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. तर सासरे आणि अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे फरार झाले आहेत.

प्रतिष्ठीत आणि श्रीमंत घराण्यात प्रेम विवाहातही हुंडा दिला जातो याच हे ठळक उदाहरण आहे. माहितीनुसार वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांनी ५१ तोळे सोनं, साडेसात किलो चांदीचा दागिना, एक फॉर्च्यूनर कार दिली होती. लग्नानंतरही एक चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल अशा अनेक गोष्टी माहेरच्या लोकांनी दिल्या. सोनं-चांदी-कार सगळं मागितलं, लेकीला त्रास नको म्हणून सर्व दिलं.

Published on: May 22, 2025 08:36 AM