Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
विश्व हिंदू परिषदेने नवरात्रीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी असेल. हिंदूंना कपाळावर टिळा लावणे आवश्यक आहे, तसेच ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड तपासणी केली जाईल. मूर्तीपूजेला विरोध करणारे मुस्लिम नवरात्रीत का सहभागी होतात, असा सवाल विहिंपने केला आहे.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गरबा आणि दांडिया कार्यक्रमांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार, गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी असेल. हिंदूंना कपाळावर टिळा लावणे आवश्यक असल्याचे विहिंपने म्हटले आहे. या नियमावलीत हिंदूंची ओळख पटवण्यासाठी कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या व्यक्तींची आधार कार्ड तपासणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेने याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे की, मूर्तीपूजेला विरोध करणारे मुस्लिम नवरात्रीच्या सणात का सहभागी व्हावे? विहिंपने हे देखील स्पष्ट केले आहे की, धर्मांतर आणि गोहत्या विरोधातील त्यांच्या मूळ उद्दिष्टांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नवरात्री उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही नियमावली तयार करण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. ही नियमावली महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही लागू होणार असल्याचे समजते.
