Voter List Irregularities : वडिलांपेक्षा मुलांचं वय जास्त, राज ठाकरेंनी यादीच वाचली!

Voter List Irregularities : वडिलांपेक्षा मुलांचं वय जास्त, राज ठाकरेंनी यादीच वाचली!

| Updated on: Oct 15, 2025 | 11:42 PM

विरोधकांनी निवडणूक आयोगासमोर बनावट आणि दुबार मतदार याद्यांचे पुरावे सादर केले आहेत. जयंत पाटलांनी एकाच घरात शेकडो मतदार तर राज ठाकरेंनी वयातील मोठी तफावत दाखवली. नालासोपाऱ्यातील एका महिलेच्या नावाचे अनेकवेळा नोंदणी आणि नंतर निवडणूक आयोगाला माहिती नसताना ती वगळली गेल्याचे समोर आले आहे. आता आयोगाच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर बनावट आणि दुबार मतदार याद्यांबाबत गंभीर आरोप करत पुरावे सादर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एकाच घरात ४०० ते ८०० मतदार असल्याची उदाहरणे दिली, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार आणि त्यांच्या पालकांच्या वयात ८० वर्षांहून अधिक तफावत असल्याचा प्रकार उघड केला.

नालासोपाऱ्यातील सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे नाव सहा वेळा मतदार यादीत होते, जे मीडियामध्ये बातमी आल्यानंतर हटवण्यात आले. मात्र, हे कोणी हटवले याची आयोगालाही कल्पना नसल्याचे पाटलांनी म्हटले. विरोधकांनी नव्या मतदार याद्या, वगळलेल्या आणि नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांची माहिती, तसेच मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने गोपनीयतेचे कारण देत सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. यावरून राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

Published on: Oct 15, 2025 11:42 PM