Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात

Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात

| Updated on: Nov 12, 2026 | 9:20 AM

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची काल सकाळी मॉर्निंक वॉकदरम्यान तब्येत अचानक बिघडली. ते बेशुद्ध पडून जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कार्डिऑलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची काल सकाळी अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मॉर्निंक वॉकसाठी बाहेर पडलेले असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले. ही घटना घडताच त्यांना तातडीने उपचारांसाठी दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय जगदीप धनखड यांना एम्सच्या कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कार्डिऑलॉजी विभागातील अनुभवी डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करत आहे. उपराष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीची तब्येत बिघडल्याने देशभरातून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा होत आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही, परंतु ते स्थिर असल्याची अपेक्षा आहे. एम्समधील डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याबद्दल पुढील माहिती लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतींच्या या आरोग्य अपडेटमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Published on: Nov 12, 2026 9:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us