मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार, थेट म्हणाल्या…
तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येतं. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते आजही जल्लोष करताना दिसत आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. मात्र आता ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही निवडणूक हरलोच नाही’ असं ममता दीदींनी वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पुढे त्या म्हणाल्या, ‘माझा राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही…’