Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर

Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर

| Updated on: Jul 22, 2026 | 2:11 PM

दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. NEET पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलनकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले असून, जंतर-मंतरपासून संसद परिसरापर्यंत या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. विविध विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवत असले, तरी केंद्र सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वाधिक विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. 2014 पासून ते सलग केंद्रीय मंत्रिमंडळाचा भाग असून त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, कौशल्य विकास व उद्योजकता, पोलाद आणि शिक्षण यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत. सध्या ते केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची शक्यता कमी असल्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. पहिलं म्हणजे, सरकारच्या मते आंदोलनाचा प्रभाव सध्या मर्यादित असून त्यातून मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. दुसरे म्हणजे, सध्या कोणतीही मोठी निवडणूक तोंडावर नसल्याने सरकारवर तातडीचा राजकीय दबाव नाही.

तिसरे कारण म्हणजे, पंतप्रधान कार्यालयाकडून मंत्र्यांच्या कामगिरीवर सातत्याने लक्ष ठेवले जाते. दीर्घकाळ मंत्रिमंडळात कायम राहिल्याने धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पंतप्रधानांचा विश्वास कायम असल्याचे मानले जाते. चौथे म्हणजे, सरकारच्या भूमिकेनुसार आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना पुरेशा ठोस पुराव्यांचा आधार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच केवळ राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून पर्यायी उपायांबाबत स्पष्ट भूमिका नसल्याचेही सरकारचे मत असल्याची चर्चा आहे.

पाचवे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा भाजपमधील दीर्घ राजकीय प्रवास. भारतीय जनता युवा मोर्चा आणि पक्ष संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान महत्त्वाचे मानले जाते.

दरम्यान, आंदोलनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनावरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे. संसद परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, आंदोलनाशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची पुढील भूमिका आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 22, 2026 2:11 PM
Follow Us