लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? छोटा पुढारीचे प्रश्न आणि जनतेची उत्तरे

| Updated on: Apr 25, 2024 | 5:21 PM

लोकसभा निवडणुकीत लातूरकरांचा अजेंडा काय? भाजप पुन्हा एकदा हॅटट्रिक करणार का? छोटा पुढारीने थेट जनतेला विचारले प्रश्न

Follow us on

Latur Lok Sabha Election 2024 : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अशातच सध्या लातूर लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा सुरु आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर मतदार संघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. 2019 मध्ये सुधाकर श्रृंगारे यांचा भाजपच्या उमेदवारीवर विजय झाला होता. मात्र या वेळी भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर कॉंग्रेसकडून नवीन चेहरा म्हणजे डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच आता महाराष्ट्राचा लाडका नेता छोटा पुढारी लातूर मतदार संघात जनतेशी संवाद साधत आहे. लोकसभा निवडणुकीत लातूरकरांचा अजेंडा काय? भाजप पुन्हा एकदा हॅटट्रिक करणार का?  कुणाला लागणार ठसका आणि कुणाला दिलासा… लातूरमधील जनतेचा कौल कुणाला? पाहा छोटा पुढारीने घेतलेला खास आढावा