मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्… महिला वकिलसोबत नको ते घडलं, पुणे हादरलं!
पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंढवा-कोरेगाव पार्क रोड परिसरात एका महिला वकिलावर धावत्या कारमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

माहितीनुसार, पीडित महिला एका पार्टीसाठी मध्यरात्री हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला. पार्टी संपल्यानंतर “मी तुला घरी सोडतो,” असे सांगत त्याने महिलेला आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, अर्ध्या रस्त्यात आरोपीने कार थांबवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित महिला पेशाने वकील असून या घटनेनंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.