बाळा भेगडेंविरोधात दोन भाजप इच्छुक रणांगणात, एक राष्ट्रवादीतून, दुसरा अपक्ष!

मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde), सुनील शेळके (Sunil Shelke) आणि रवींद्र भेगडे (Ravindra Bhegde) या तिघांनी भाजपच्या तिकीटावर दावा केला.

बाळा भेगडेंविरोधात दोन भाजप इच्छुक रणांगणात, एक राष्ट्रवादीतून, दुसरा अपक्ष!

पुणे : उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील गटबाजी उघड होत आहे. विशेषत: भाजपमधून अनेकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. मावळ मतदारसंघात भाजपच्या तिकीटासाठी जोर लावणारे तीन उमेदवार एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत. मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde), सुनील शेळके (Sunil Shelke) आणि रवींद्र भेगडे (Ravindra Bhegde) या तिघांनी भाजपच्या तिकीटावर दावा केला. तिकीट आपल्यालाच मिळावं म्हणून हर तऱ्हेचे प्रयत्न केले.

भाजपने मंत्री बाळा भेगडेंना मावळची उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपकडूनच इच्छुक असलेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं. तर रवींद्र भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

रवींद्र भेगडे, बाळा भेगडे आणि सुनील शेळके या तिघांनीही गेल्या सहा महिन्यापासून भाजपचं कमळ घराघरात पोहोचवलं. त्यामुळे यंदा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास तिघांनाही होता. मात्र भाजपने शेवटपर्यंत तिघांनाही होल्डवर ठेवत, अंतिम क्षणी बाळा भेगडेंना तिकीट दिलं.

भाजपचं तिकीट न दिल्याने तयारी केलेले अन्य दोघे म्हणजे सुनील शेळके आणि रवी भेगडे यांनी निवडणुकीतून माघारी न घेण्याचा निर्णय घेतला. शेळकेंनी राष्ट्रवादीकडून तर रवी भेगडेंनी अपक्ष अर्ज भरला.

भाजपच्या तीनही निष्ठावंतांनी विविध पक्षातून अर्ज भरल्याने आता मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण त्याआधी भाजप कुणाचं बंड मोडून काढणार हे 7 तारखेला कळेल, कारण अर्ज माघारीची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *