देवेंद्र फडणवीस 12 नोव्हेंबर 2014 ची पुनरावृत्ती करणार?

निवडणूक निकालात भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस 12 नोव्हेंबर 2014 ची पुनरावृत्ती करणार?

मुंबई : निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालाचाली (BJPs 2014 formula to form government ) सुरु झाल्या आहेत. अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि शिवसेना दोघांकडून (BJPs 2014 formula to form government ) प्रयत्न सुरु आहेत. निवडणूक निकालात भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

यानंतर अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ सुरु आहे. शिवसेनेला आतापर्यंत 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर भाजपला 6 अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.

दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. शिवसेनेने 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन देत मुख्यमंत्रीपद मागितलं आहे. मात्र भाजपने मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचं  वेळोवेळी सांगितलं. अशा परिस्थितीत शिवसेने सातत्याने 50-50 फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करुन देत आहे.

 2014 ची पुनरावृत्ती?

शिवसेनेच्या दबावामुळे भाजपकडूनही चाचपणी सुरु आहे. 2014 मध्ये ज्या पद्धतीने भाजपने सरकार स्थापन केलं, त्याच पद्धतीने सरकार स्थापन्याचा पर्याय भाजप तपासून पाहात आहे. अदृश्य हातांच्या बळावर भाजप शिवसेनेशिवाय सरकार स्थापन्याचा प्रयत्नात असल्याची माहिती, सूत्रांनी दिली.  2014 च्या पुनरावृत्तीसाठी भाजपचा एक गट आक्रमक आहे.  त्यामुळे शिवसेनेशिवाय इतर पर्यायासोबत भाजपची चाचपणी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

2014 मध्ये काय झालं होतं?

2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत भाजपला 122 अधिक 1 अपक्षासह 123 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेना 61 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने स्थिर सरकारसाठी भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला होता.

 12 नोव्हेंबर 2014 रोजी आवाजी मतदान

देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं होतं. मात्र ते अल्पमतातील सरकार होतं. सभागृहात त्यांना बहुमत सिद्ध करणे आवश्यक होतं. देवेंद्र फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यास 12  नोव्हेंबर 2014 रोजीची मुदत होती. त्यावेळी सभागृहात झालेल्या प्रचंड गदारोळात फडणवीसांनी विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला होता.

शिवसेनेचा आक्षेप

भाजपच्या या आवाजी मतदानाच्या प्रस्तावावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. काँग्रेसनेही त्यावेळी विरोध केला होता. दोन्ही पक्षांनी आक्षेप नोंदवत मतविभाजन करण्याची मागणी केली. कोणत्या पक्षाची किती मतं भाजपच्या बाजूने हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेने मतविभागणीची मागणी केली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची मागणी फेटाळली होती.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

दरम्यान, भाजपला त्यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र सेनेऐवजी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्याचा ठपका  भाजपवर बसणार होता. ते टाळण्यासाठी आवाजी मतदानाची खेळी केल्याचा आरोप त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाला होता.

2014 मध्ये एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी

सभागृहातील गोंधळानंतर हरीभाऊ बागडेंनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन, भाजपच्या पारड्यात सत्ता टाकली होती. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा बागडेंनी केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *