राष्ट्रवादीसारखा मित्र असेल तर शत्रूची गरज नाही, निकालापूर्वीच आघाडीत राडा

मतदानानंतर (Maharashtra Assembly election results 2019)  जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत (Congress-NCP clashes) तू तू मै मै सुरु झाली आहे.

Congress-NCP clashes Maharashtra Assembly election results 2019, राष्ट्रवादीसारखा मित्र असेल तर शत्रूची गरज नाही, निकालापूर्वीच आघाडीत राडा

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच (Maharashtra Assembly election results 2019) काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP clashes) आघाडीत बिघाडीचं चित्र निर्माण झालं आहे. मतदानानंतर (Maharashtra Assembly election results 2019)  जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत (Congress-NCP clashes) तू तू मै मै सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार मजीद मेमन (Majeed Memon) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी प्रचारापासून दूर राहिल्या. राहुल गांधींनी तुरळक सभा घेतल्या, मात्र त्यामध्ये काँग्रेस नेत्यांचीच वाणवा होती. केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक प्रचारात प्रचंड मेहनत घेतली. काँग्रेससोबत केवळ मजबुरी म्हणून आघाडी केली” असं मजीद मेमन म्हणाले.

काँग्रेसचं उत्तर

मेमन यांच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजन भोसले यांनी राष्ट्रवादीसारखा मित्र असेल, तर शत्रूची गरज नाही, असा घणाघात केला. भोसले म्हणाले, “तुम्हाला शत्रूची गरज नसेल जेव्हा तुमच्यासोबत राष्ट्रवादी असेल”

जर शरद पवार सोडले तर राष्ट्रवादीचे अन्य नेते प्रचारात होते का? असा सवालही त्यांनी राष्ट्रवादीला विचारला. राष्ट्रवादीचे अन्य नेते नसल्याने 80 वर्षीय पवारांना प्रकृती अस्वास्थानंतरही प्रचारात उतरावं लागल्याचं भोसले म्हणाले.

वरिष्ठांकडून सारवा सारव

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या टीका टिपण्णीनंतर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. तसंच दोघांची वक्तव्यं खोडून काढली.

या सर्व प्रकारानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीत निकालानंतर काय होईल याचा अंदाज लावलेलाच बरा. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झालं तर 24 ऑक्टोबरला निकाल आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *