राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड शिवसेनेच्या संपर्कात?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच आहे. राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार (NCP MLA Suresh Lad) शिवसेनेच्या संपर्कात आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड शिवसेनेच्या संपर्कात?
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 3:57 PM

रायगड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच आहे. राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार (NCP MLA Suresh Lad) शिवसेनेच्या संपर्कात आहे.  कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार सुरेश लाड (NCP MLA Suresh Lad)  हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सुरेश लाड हे सुनील तटकरे यांच्या सर्वात जवळचे सहकारी आहेत. सुनील तटकरे यांचा सख्खा पुतण्या अवधूत तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता सुरेश लाड हे सुद्धा सेनेच्या संपर्कात असल्याने तटकरेंची धाकधूक वाढली आहे.

कोण आहेत सुरेश लाड?

  • सुरेश लाड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.
  • 1999 मध्ये लाड कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र 2004 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये लाड पुन्हा निवडून आले.
  • सुरेश लाड हे सुनील तटकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जातात.

कर्जतमधून एबी फॉर्म दुसऱ्यालाच

दरम्यान, सुरेश लाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी शिवसेनेने कर्जत मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना शिवसेनेकडून तिकीट देण्याची तयारी केली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला. यावेळी  माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील उपस्थित होते.  महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आहेत.

संबंधित बातम्या 

रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, आमदार लाडांची कन्या कर्जतमध्ये पराभूत   

रायगड जिल्हा आढावा | सर्वांची ताकद समान, यंदा कुणाची बाजी? 

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.