अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच!

अरविंद सावंतांचा (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच!

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) यांनी काल (11 नोव्हेंबर) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सावंतांचा (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सावंत यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा मराठी मंत्र्याकडेच देण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अरविंद सावंत यांचं अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. जावडेकर यांच्याकडे या मंत्रालयाचा तात्पुरता कार्यभर असेल.

अरविंद सावंत यांचा राजीनामा

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा काल दिला. अरविंद सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे’ अशा शब्दात अरविंद सावंत (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) यांनी संताप व्यक्त केला.

‘लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप आणि सत्तावाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

अरविंद सावंत यांनी काल सकाळी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केलं.

कोण आहेत अरविंद सावंत?

67 वर्षीय अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदारपदी निवडून आले आहेत. मोदी 2.0 सरकारमध्ये सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं. शिवसेनेच्या वाट्याचं हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद आहे. पहिल्या मोदी सरकारमध्येही हेच खातं शिवसेनेला मिळालं होतं. त्यावेळी अनंत गिते या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते.

1995 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ पक्षासाठी झोकून दिलं. 1996 मध्ये अरविंद सावंत विधानपरिषदेवर आमदारपदी निवडून आले. 2010 मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून बढती मिळाली.

2014 मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी शड्डू ठोकला होता. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता. परंतु देवरांचा तब्बल एक लाख 20 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव करुन ते खासदारपदी निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला.

संबंधित बातम्या 

50 वर्षांपासून शिवसैनिक, साडेपाच महिन्यांचं मंत्रिपद, अरविंद सावंत यांची कारकीर्द   

BREAKING | शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *