राज ठाकरे सर्व पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार

महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (25 ऑक्टोबर) कृष्णकुंजवर (Raj thackeray meet all mns candidate) बैठक बोलवली आहे.

Raj thackeray meet all mns candidate, राज ठाकरे सर्व पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार

मुंबई : महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (25 ऑक्टोबर) कृष्णकुंजवर (Raj thackeray meet all mns candidate) बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सकाळी 11 च्या दरम्यान सर्व उमेदवार (Raj thackeray meet all mns candidate) कृष्ककुंजवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण 105 ठिकाणी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र यामधील फक्त एकाच उमेदवाराचा विजय झाला आहे. तर बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. 2014 च्या निवडणुकीतही मनसेनेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता.

कल्याण येथून मनसेचे राजू पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा 7 हजारच्या फरकांनी पराभव केला. या मतदारसंघात शिवसेना आणि मनसे अशा दोघांमध्ये चुरशीची लढत होती.

विधानसभा निवडणुकीतील अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांनी अटीतटीची लढत दिली आहे. त्यामध्ये अनेक उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद साधून आत्मचिंतन करणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *