राम शिंदेंच्या घरी जाऊन रोहित पवार म्हणाले, 'विकासासाठी कटिबद्ध आहे, कार्यकर्त्यांची भाडणं नको'

राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे (Rohit Pawar Ram Shinde)  यांच्यातील.  पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित पवार यांनी विद्यमान मंत्री राम शिंदे (Rohit Pawar Ram Shinde) यांचा पराभव केला.

Rohit Pawar Ram Shinde, राम शिंदेंच्या घरी जाऊन रोहित पवार म्हणाले, ‘विकासासाठी कटिबद्ध आहे, कार्यकर्त्यांची भाडणं नको’

अहमदनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly election results 2019) जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत ((Maharashtra Assembly election results 2019)) नंबर एकचा पक्ष ठरला आहे. राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे (Rohit Pawar Ram Shinde)  यांच्यातील.  पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित पवार यांनी विद्यमान मंत्री राम शिंदे (Rohit Pawar Ram Shinde) यांचा पराभव केला.

Rohit Pawar Ram Shinde, राम शिंदेंच्या घरी जाऊन रोहित पवार म्हणाले, ‘विकासासाठी कटिबद्ध आहे, कार्यकर्त्यांची भाडणं नको’

टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. मात्र रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.

राम शिंदे यांच्या कुटुंबियांनीही रोहित पवार यांचं स्वागत आणि मान-पान केलं. शिंदे कुटुंबियांनी रोहित पवार यांना मानाचा फेटा आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केलं.

रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. रोहित पवार म्हणाले, “आशीर्वाद असूद्या, विकासासाठी कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांचं विकासाबाबत कोणतंही भांडण नको, विकासाबाबत सर्वांनी एकत्र राहावं. एवढंच मला सांगायचं होतं”

Rohit Pawar Ram Shinde, राम शिंदेंच्या घरी जाऊन रोहित पवार म्हणाले, ‘विकासासाठी कटिबद्ध आहे, कार्यकर्त्यांची भाडणं नको’

रोहित पवार बोलत असताना उपस्थितांपैकी एक जण म्हणाला, शिंदेसाहेब म्हणतील तसं… त्यावर रोहित पवार म्हणाले, म्हणूनच मी त्यांना भेटायला आलो आहे.

सर्व भेटी झाल्यानंतर रोहित पवार यांना दारापर्यंत पोहोचवण्यासाठी राम शिंदे स्वत: बाहेर आले. त्यानंतर रोहित पवार पुढील प्रवासाला रवाना झाले.

रोहित पवार यांनी राजकीय सभ्यता आणि सुसंस्कृतपणा दाखवल्याने त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी कोल्हापुरातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी विजयानंतर राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *