काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, पवारांनी सांगितलं जागावाटपाचं सूत्र

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 125 जागा लढवणार आहे, तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येतील, अशी माहिती शरद पवारांनी नाशिकमध्ये दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, पवारांनी सांगितलं जागावाटपाचं सूत्र

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब (Congress NCP Alliance Fixed) झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा 50-50 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती (Congress NCP Alliance Fixed) खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये दिली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील 288 जागांपैकी प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी कोणत्या जागा कोण लढवणार, अनेक आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे कोणते उमेदवार मैदानात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष असलेल्या आघाडीमध्ये मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार (Congress NCP Alliance Fixed), हे उत्सुकतेचं आहे.

बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी…. : नितीन गडकरी

आठवड्यात कदाचित निवडणूक जाहीर होतील. प्रत्यक्ष मतदानाला 25 -30 दिवस राहिले आहेत. काही जागांवर अदलाबदल शक्य असल्याचं शरद पवार म्हणाले. नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर संयुक्त सभांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीचा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे, असंही पवार म्हणाले.

ज्या पक्षात आमचे लोक जातात त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे. आमच्यातले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. राज्यात सत्ता त्यांची येईल अस काहींना वाटतंय. 27 वर्ष मी विरोधी बाकावर होतो. मला विरोधी पक्षात जास्त समाधान मिळालं. कारण विरोधकांची जबाबदारी येते तेव्हा थेट लोकांपर्यंत पोहचता येतं, असंही शरद पवार म्हणाले.

सोडून जाणाऱ्यांच्या अंतःकरणात मी आहे असं ऐकतोय. 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. आमच्या पक्षातील काही जणांच्या संस्थेची चौकशी सुरु झाली आहे, असं गेलेले अनेक जण सांगतात. सरकारी यंत्रणांचा आयुध म्हणून वापर केला जात आहे. लोक शहाणे आहेत तेच मेगाभरतीचा निकाल लावतील, असंही पवार म्हणाले.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *