सोलापुरात नेत्याच्या विजयासाठी नवस, कार्यकर्त्याचा 18 किलोमीटर दंडवत

निवडणुका म्हटलं तर प्रत्येक पक्षातील नेत्यांपेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा असतो तो म्हणजे कार्यकर्ता. नेत्याचा निवडणूक प्रचार ते घराघरात त्याचे काम हा कार्यकर्ताच पोहचवत असतो.

सोलापुरात नेत्याच्या विजयासाठी नवस, कार्यकर्त्याचा 18 किलोमीटर दंडवत

सोलापूर : निवडणुका म्हटलं तर प्रत्येक पक्षातील नेत्यांपेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा असतो तो म्हणजे कार्यकर्ता. नेत्याचा निवडणूक प्रचार ते घराघरात त्याचे काम हा कार्यकर्ताच पोहचवत असतो. नेता विजयी होण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतात. सोलापुरातही अशाच एका कार्यकर्त्यांने आपला नेता विजयी होण्यासाठी नवस (Sangola shivsena activist)  केला होता. विशेष म्हणजे तो नवस फेडण्यासाठी कार्यकर्त्याने 18 किलोमीटर दंडवत (Sangola shivsena activist) घातले आहे.

सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विजयासाठी अनेक कार्यकर्ते जीवाचे रान करत होते. त्यातच या मतदारसंघातील सुपली गावातील बापू जावीर या तरुणाने शहाजी पाटील विजयी व्हावे यासाठी नवस केला. नवस केल्यामुळे बापू जावीर यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरु होती.

“सांगोला मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. यामध्ये शिवसेनेचे शहाजी बापू पाटील विजयी होऊ दे. मी माझ्या गावापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दंडवत घालीन”, असा नवस या कार्यकर्त्याने केला होता. मतमोजणीच्या दिवशी शहाजी पाटील हे 674 मतांच्या फरकाने विजयी झाले.

सध्या सर्वत्र या कार्यकर्त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. आपल्या नेत्यासाठी नवस करणारा एकमेव कार्यकर्ता म्हणून सध्या बापू जावीर यांचे नाव घेतले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *