आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य मिळेल : तेजस ठाकरे

महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस ठाकरे यांनी 'टीव्ही9 मराठी'शी बोलताना व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य मिळेल : तेजस ठाकरे

मुंबई : राजकारणापासून दूर राहिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यंदाच्या निवडणुकीत सभांच्या व्यासपीठावर दिसत आहेत. वरळी मतदारसंघात मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे (Tejas Thackeray Campaign for Aditya Thackeray) मैदानात उतरले. महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास यावेळी तेजस ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

माझ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहेत. सर्व उमेदवारांच्या सोबत आहेत. 24 तारखेला अख्खा महाराष्ट्र भगवा होणार, असं तेजस ठाकरे म्हणाले. 124 जागांपैकी किती जागांवर विजय मिळेल? असा प्रश्न विचारला असता 124 वगैरे काही नाही. शिवसेना-भाजपची महायुती आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र भगवा होणार, महाराष्ट्राने कधी पाहिलं नसेल इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस यांनी (Tejas Thackeray Campaign for Aditya Thackeray) व्यक्त केला.

प्रत्येकाने समाजासाठी योगदान दिलं पाहिजे. जर मी निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून ते करत असेन, तर मला राजकारणात उतरण्याची गरज नाही. राजकारणात येण्याचा तूर्तास काही प्लॅन नाही. सध्या शिक्षण सुरु आहे. निवडणुका आल्यामुळे घरात राजकीय वातावरण आहे. अशातला भाग नाही. निवडणुका सतत सुरुच असतात, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे आमच्याही घरात चर्चा होतात, असं तेजस यांनी सांगितलं.

आरे वाचवणारच

आरेमध्ये गेली कित्येक वर्ष माझं संशोधन आणि काम सुरु आहे. शिवसेनेची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली आहे. आरे जंगल आहेच आणि सरकार बसल्यावर त्याला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करणार. माझ्यासारखे अनेक पर्यावरणप्रेमी आरेसाठी लढत आहेत. आरे वाचवलं पाहिजे आणि वाचवणारच. परंतु मी राजकारणात सहभागी नसल्यामुळे वचननाम्यात ‘आरे’चा उल्लेख नसल्याविषयी बोलू शकणार नाही, असं तेजस ठाकरेंनी स्पष्ट केलं.

बाळासाहेबांनी ‘तोडफोड सेना’ उल्लेख केलेले तेजस ठाकरे नेमकं काय करतात?

सरडे-खेकड्यांच्या प्रजातींना माझं नाव देण्याचा उद्देश नाही, पण सह्याद्रीच्या रांगांकडे किती लक्ष वेधलं जातं आणि संरक्षण मिळतं, यात समाधान आहे, असं ते म्हणाले.

जे शिवसैनिक महाराष्ट्रभर काम करत आहेत, त्यांना तुम्ही जनतेला प्रेम देत राहा, लोक तुम्हाला प्रेम देतील, असा संदेश तेजस ठाकरेंनी दिला.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *