मतदार आमच्या बाजूने होते, मात्र आम्हीच कमी पडलो, काँग्रेसची कबुली!

यूथ काँग्रसेचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी ट्विट करुन ही कबुली दिली आहे. मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते, आम्हीच कमी पडलो, असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं.

मतदार आमच्या बाजूने होते, मात्र आम्हीच कमी पडलो, काँग्रेसची कबुली!

Satyajeet Tambe मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचं (Maharashtra Assembly election results 2019) चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. हाती आलेल्या कलानुसार (Maharashtra Assembly election results 2019) भाजप-शिवसेना महायुतीने बहुमताचा 145 हा आकडा पार केला. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही शंभरीपर्यंत मजल मारल्याचं चित्र आहे. अंतिम निकाल अद्याप हाती आलेला नाही. मात्र आम्ही कमी पडलो अशी कबुली काँग्रेसने (Satyajeet Tambe) दिली आहे.

यूथ काँग्रसेचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी ट्विट करुन ही कबुली दिली आहे. मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते, आम्हीच कमी पडलो, असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बडे नेते प्रचारात दिसलेच नव्हते. आघाडीत केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एकट्याने मैदान गाजवलं होतं. शरद पवारांनी राज्यभरात सभा घेऊन प्रचारात रंगत आणली होती. काँग्रेसचे नेते प्रचारात न दिसल्याने राष्ट्रवादीच्या  नेत्यांनी उघड उघड त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आपण कमी पडल्याचं मान्य करत आहेत.

एकीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यासारखे दिग्गज नेते प्रचारात होते. पण काँग्रेसचे बडे नेते प्रचारात दिसले नव्हते. त्यामुळे आम्ही कमी पडलो असं आता सत्यजीत तांबे यांनी मान्य केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *