शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम, उद्धव ठाकरेंचा निर्धार कायम

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रनमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on CM) यांनी पुन्हा एकदा शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याचं दाखवून दिलं.

शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम, उद्धव ठाकरेंचा निर्धार कायम

मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रनमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on CM) यांनी पुन्हा एकदा शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याचं दाखवून दिलं. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray on CM) या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं.

नुकतंच भाजप नेते नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाचा 50-50  फॉर्म्युला ठरला नाही असं म्हटलं. मात्र त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही सेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही जनतेची भावना असल्याचं म्हणत, भाजपला थेट संदेश दिला.

जे ठरलं आहे, ते द्या, त्यापेक्षा जास्त नको अशी शिवसेनेची भूमिका आहे.  उद्धव ठाकरेंनी आज जिल्हाप्रमुख आणि खासदारांना मार्गदर्शन करताना, काल जी आमदारांसमोर भूमिका मांडली होती, तीच भूमिका आजही त्यांनी मांडली. त्यानंतर सर्व जिल्हाप्रमुख आणि खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर हात वर करुन त्याला समर्थन दिलं. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेची भूमिका ही मुख्यमंत्रिपदावर कोणतीही तडजोड नाही, अशीच असल्याच दिसून येतं.

मी मध्यस्थीला तयार : नितीन गडकरी

“गरज पडल्यास मी मध्यस्थी करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari on BJP Shiv Sena formula) यांनी म्हटलंय. ते (Nitin Gadkari on BJP Shiv Sena formula) मुंबईत बोलत होते.

संबंधित बातम्या 

अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : नितीन गडकरी 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *